लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: गडचिरोलीत पोलिसांकडे आत्मसमर्पण केलेल्या ४८ खाजगी नोकरी देऊन त्यांच्यासाठी नवीन आशा निर्माण केल्या आहेत. लॉयड मेटल्सच्या नव्याने स्थापन झालेल्या प्लांटमध्ये या नक्षलवाद्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना १५ ते २० हजार रुपये मासिक पगारावर विविध युनिट्समध्ये काम देण्यात आलं आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण ६०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. या नक्षलवाद्यांना सरकराकडून पूर्वी घर बांधण्यासाठी जमीन, पैसा आणि मदत दिली जात होती, मात्र ते करत असलेल्या रोजंदारीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत नव्हता, म्हणून गडचिरोली पोलिसांनी लॉयड्स मेटल्सशी संपर्क साधला, त्यांनी प्रोफाइलिंगसाठी पुढाकार घेतल्याचं गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी सांगितलं.
याअंतर्गत नोकरीसाठी ४८ नक्षलवाद्यांची निवड झाली असून, प्रशिक्षणाच्या आधारे त्यांना १५ ते २० हजार रुपये मासिक पगारावर कामावर ठेवण्यात आलं आहे. गेल्या ७ दिवसांत १३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. लाईड मेटल्स नं त्यांच्यावर प्रोफाइलिंग करून त्यांचं पुनर्वसन केलं आहे. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणांनतर त्यांच्या पात्रतेच्या आधारे त्यांना विविध तुकड्यांमध्ये काम दिलं आहे. अशी माहिती निलोत्पल यांनी दिली आहे.