खाजगी पशुधन पर्यवेक्षक संपावर

  • बीड जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक संपावर.
  • अनेक पशुधन मृत्युमुखी तर अनेक जनावरांची तडफड.
  • शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यातील काही खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर हे संपावर गेल्यामुळे अनेक पशु मृत्यूमुखी पडत आहेत तर अनेकांना उपचाराअभावी तडफड नेण्याची वेळ आली आहे.

काही दिवसापासून या डॉक्टरांचा संप सुरू असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कमी पडताना दिसत आहेत. जे सरकारी डॉक्टर त्यांची संख्या तुटपुंजी असल्यामुळे ही सर्व मदार खाजगी डॉक्टरांवर असते मात्र खाजगी डॉक्टरांचा संप सुरू असल्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. तर अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये जनावरं तडफडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा  :

तीन दिवसांनंतरही पाण्यातूनच सुरु आहे वाहनांचा धोकादायक प्रवास

धक्कादायक!! पैश्याच्या वादातून मुलाने केली आईची हत्या!

 

 

beedlead story