प्रा. रमेशजी बारसागडे गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड

माजी खा. अशोकजी नेते यांच्याकडून पुष्पगुच्छ देत मन:पूर्वक स्वागत; ‘संघटन कौशल्यातून जिल्ह्याला नवे बळ मिळेल’ – डॉ. अशोक नेते..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, ३१ मे : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रा. रमेशजी बारसागडे यांची नुकतीच निवड झाली असून, त्यांच्या या नियुक्तीचे जिल्हाभरात स्वागत होत आहे. आज चामोर्शीत आयोजित कार्यक्रमात माजी खासदार आणि भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देत बारसागडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

या वेळी डॉ. नेते म्हणाले, “प्रा. रमेश बारसागडे सर यांनी समाजकार्य व संघटन क्षेत्रात घेतलेला सक्रिय सहभाग आणि अनुभव भाजपच्या जिल्हा संघटनेला नवे बळ देणारा ठरेल. त्यांच्याशी पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास आहे.”

कार्यक्रमात भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री सलिम शेख, भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, जेष्ठ नेत्या पुष्पाताई करकाडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. बारसागडे यांचा पक्षात दीर्घकालीन सक्रिय सहभाग, ग्रामीण भागातील संघटनात्मक जाळे आणि जनतेशी असलेली थेट नाळ यामुळेच त्यांना जिल्हाध्यक्षपदी संधी देण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

bjpGadchiroli bjp presidentGadchiroli politics