झनकारगोंदी फाट्यावर वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

१,एप्रिल : कोरची सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावाला कंटाळून १२ एप्रिल रोजी झंकार गोंदी फाट्यावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विजेच्या लपंडावाने त्रस्त कोरची तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक सर्वपक्षी पदाधिकाऱ्यांनी ४ ऑगस्ट, २०२० ला झंकारगोंदी फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले होते. काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले दिले आहे. होते. या गोष्टीला दोन वर्षे झाली, परंतु ही समस्या अद्याप मार्गी लागली नाही. त्यामुळे नाईलाजाने पुन्हा कोरची तालुक्यातील सर्व पक्षाचे पुढारी ९ ला कोरची येथील हनुमान मंदिरात गोळा झाले. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशा प्रकारे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, १० एप्रिल रोजी पक्षीय पदाधिकारी व गावकरी यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोमनाथ माळी व पोलिस निरीक्षक अमोल फरतडे यांना दिले आहे.

निवेदन देताना सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये, सचिव नंदकिशोर वैरागडे, उपाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, सह सचिव आनंद चौबे, कोषाध्यक्ष मनोज अग्रवाल, संघटक सियाराम हलामी, प्रसिद्ध प्रमुख शालीकराम कराडे, हकिमुद्दीन शेख, धनिराम हिडामी, झाडुराम सलामे, डॉ. नरेश देशमुख, अशोक गावतुरे, डॉ. शैलेंद्र बिसेन, सदरुद्दीन भामानी, राजेश नैताम, घनश्याम अग्रवाल, नितीन रहेजा आदी उपस्थित होते. याला सभोवतालच्या गावातील नागरिकांनी पाठींबा दर्शविला आहे.

हे देखील वाचा,

मोठी बातमी! शरद पवारांना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द

कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’आणि ‘मदार’ या तीन सिनेमांची निवड

‘संविधान उद्देशिका’ आता आदिम माडिया भाषेत

 

CEO Kumar AshirwadCM eknath shindecolector sanjay minaDCM Devendra Fadnavis