धान्य साठविण्यासाठी अडपल्लीचे गोडावून उपलब्ध करा..

खा.अशोक नेते यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी..

गडचिरोली दि. 11 नोव्हें:- चामोर्शी तालुक्यातील वसंतपुर परिसरात मोठ्या प्रमाणावर धानपिक घेतल्या जाते.मात्र येथे धान खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना घोट किंवा आष्टी येथे धान्य विक्रीकरिता न्यावे लागते व ते त्यांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी नुसार नजीकच्या 400 मीटर अंतरावरील अडपल्ली चक ता. चामोर्शी येथे उपलब्ध असलेले सभागृह मार्केटिंग फेडरेशनला धान खरेदी व साठवणुकीकरिता देण्यात यावे, अशी मागणी वजा निर्देश खासदार अशोक नेते यांनी जिल्हाधिकारी दिपकजी सिंगला यांच्याकडे केली आहे.

मार्केटिंग फेडरेशन ने सदर सभागृह आपल्या ताब्यात घेऊन याठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करून मालाची साठवणूक करावी व वसंतपुर अडपल्ली परिसरातील नागरिकांची अडचण दूर करावी अशीही मागणी खासदार अशोक नेते यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मार्केटिंग फेडरेशन चे व्यवस्थापक यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करावी असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले आहे.