आरमोरी तालुक्यात रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या – दिलीप घोडाम

गडचिरोली काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. ५ मे : गडचिरोली जिल्हासह आरमोरी तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागात कोविड-१९ प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात संसर्गाचा प्रसार खेड्यापाड्यात झपाट्याने  वाढत  असल्याने कोरोना पाझिटिव्ह ची संख्या समोर येत आहे. मात्र ग्रामीण दुर्लक्षित भागात रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

सध्या कोविड 19 च्या प्रादुर्भाव असल्याने लाकडाऊन जाहीर केल्याने  शेतकरी ,मजूर , हे बेरोजगार  हवालदिल झाले आहे आणि अशातच परिवाराची प्रकृती बिघडल्यास खाजगी वाहनाने तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आर्थिक बाजू सक्षम नसल्याने अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गरीब रुग्णाना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.  उपजिल्हा रुग्णालय आरमोरी , व प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी  या ठिकाणी रुग्णवाहिकाची अत्यंत आवश्यकता आहे.

आरमोरी तालुक्याची लोकसंख्या सर्वात  जास्त असून  अनेक दुर्गम ग्रामीण भागात गावे प्रस्थापित आहेत. त्या गावात पाहीजेत तसे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना ग्रामिण भागातुन  खाजगी वाहनाने आपले जिव धोक्यात टाकून आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. गेल्या वर्षाभरापासून कोवीड -19 चा प्रादुर्भाव  सुरू आहे. यावर्षी ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात सुरू असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. वेळीच शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे नियम पाळले नाही तर कोविड 19  चा प्रादुर्भाव वाढून तिसऱ्या चरणात पोहचण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आरमोरी तालुक्यातील सभोवतालच्या गावातून बरेच रुग्ण पाझिटिव्ह निघत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना गडचिरोली किंवा इतर कोविड- सेंटरवर उपचारासाठी हलवावे लागते त्यासाठी वेळेवर  गोरगरीब रुग्णांना रुग्णवाहीका मिळणे आवश्यक आहे परंतु आरमोरी तालुक्यात बोटावर मोजण्या ईतक्याच रुग्णवाहिका असल्याने त्या रुग्णवाहिका जास्तीत जास्त र महिला प्रसूतीसाठीच जास्त वापर होत असल्याने कोरोना पाझिटिव्ह रुग्णांसाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने दुर्गम  ग्रामिण भागातील रुग्ण दगावल्याच्या घटना समोर येत आहे.

त्यामुळे आरमोरी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आरमोरी, ग्रामपंचायत जोगीसाखरा, प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी येथे मदत व पुनर्वसन निधी मधून रुग्णवाहीका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे.

आरमोरी तालुक्यात रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका अल्प आहेत,  कोविड 19 प्रादुर्भावात  रुग्णवाहिका अत्यंत  महत्वाचे आहे. त्यासाठी दिलीप घोडाम यांनी रुग्णवाहिकाची मागणी केल्याने  स्वतः दखल घेतली असून  रुग्णवाहीका लवकरात लवकर मिळवून देण्यात येईल.

विजय वडेट्टीवारमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

हे देखील वाचा :

अखेर चक्रीवादळ, गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे सुरू

डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये ८३ जागांसाठी भरती

Dilip Ghodamlead story