- खासदार अशोक नेते यांची केंद्रीय पर्यटन विभागाच्या महासंचालक यांचेशी चर्चा
- मार्कंडा देवस्थानच्या विकासासाठी खा. अशोक नेते सरसावले
गडचिरोली, दि ०८ जानेवारी: विदर्भाशी काशी म्हणून ओळखला जाणारा चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान हा फक्त विदर्भच नाही तर अख्ख्या महाराष्ट्र व बाहेर राज्यात ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मात्र या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होते. या वैनगंगा नदी तीरावर असलेल्या पर्यटन स्थळच्या सर्वांगीण विकासासाठी या स्थळाला केंद्रीय पर्यटन स्थळ घोषित करून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी केंद्रीय पर्यटन विभागाच्या महासंचालक यांच्या कडे केली व या विषयावर सविस्तर चर्चा करून तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यथाशिग्र निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.