लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
प्रतिनिधी: सुनील टोपले, जव्हार
पालघर, दि. १८ जुलै : जव्हार तालुक्यात गेल्या ८-१० दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी यामुळे जव्हार तालुक्यात मोठ्या संख्येने घरे कोसळून मोठं नुकसान झालं आहे. शिवाय शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने घरे आणि नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पाहणी करून पंचनामे करावे आणि बाधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी शिष्टमंडळाने जव्हार तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तहसीलदार यांनी शिष्टमंडळाला सर्व मागण्या योग्य असून त्या मान्य करत नुकसानीचे तात्काळ पांचानामे करण्याबाबत निर्देश दिले. तसेच बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले.
गेल्या ८-१० दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी अतिवृष्टीचा फटका जव्हार तालुक्याच्या ग्रामिण आदिवासीं कुटूंबांना मोठ्या प्रमाणात बसतांना पाहायला मिळतोय. अतिवृष्टीमुळे जव्हार तालुक्यात अनेक घरे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून याबाबत अपेक्षित दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्यात यावी, बाधितांना नुकसान भरपाई देण्यात मिळावी, तसेच जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायत मधे असणारा जिओ, कंपनीच्या मोबाईल टॉवर ची रेंज कमी झाल्यामुळे संपर्क करण्यास अडचण होत आहे. त्यामुळे जव्हार तालुक्यातील दाभेरी व भोपदरी या ठिकाणी नवीन टॉवर झाले आहेत परंतु अजूनही अजूनही कार्यरत झालेले नाहीत. त्यामुळे संपर्क करण्यास मोठी अडचण होत आहे. म्हणून हे टॉवर तात्काळ कार्यरत करावे अशा मागण्यांचे निवेदन घेऊन आज बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जव्हारच्या तहसीलदार श्रीमती ठेमकर यांची भेट घेतली.
यावेळी जव्हार तहसीलदार मॅडम यांना निवेदन स्वीकारून शिष्टमंडळासोबत चर्चा करताना पडझड झालेल्या घरांना तत्काळ मदत केली जाईल व तालुक्यात जिथे जिथे शेतीचे नुकसान झाले आहे त्यांची संबधित तलाठी यांना आज सूचना करून पाहणी करण्यासाठी सांगते आहे. तसेच जियो कंपनीच्या रेंज संधर्भात संबंधिताना पत्र व्यवहार करून रेंजची समस्या मिटविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा, उपाध्यक्ष अनंता धनगरे,सल्लागार तथा माजी सरपंच वसंत दिघा,युवा आदिवासी संघ अध्यक्ष तथा माजी सरपंच अशोक राऊत,वाढू,लक्ष्मण पारधी,युवराज गवारी,नवसू पिठोले आदी मान्यवर उपस्थित होते.