रास्त भाव दुकानदारांना प्रतिबंधात्मक लसीसह किट उपलब्ध करा – संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १५ मे : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सार्वजनीक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदार यांना प्राधान्याने कोविडची प्रतिबंधात्मक लस व किट उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी जनकल्याण समाज्योन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत रास्तभाव दुकानातून गरजू पात्र शिधापत्रिकाधारक व्यक्तींना धान्याचा पुरवठा दरमहा नियमितपणे करण्यात येतो. धान्याचा पुरवठा करीत असतांना धान्य दुकानदारांचा अनेक व्यक्तींशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना किंवा त्यांचेमार्फत इतर व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण होणार नाही. यासाठी स्वस्त धान्य दुकानदार यांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस प्रतिबंधकरण्याकरीता किट प्राधान्याने देणे आवश्यक आहे.

परभणीचे जिल्हाधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्याकरीता धान्य दुकानदारांना कोरोना प्रतिबंधक लस व किट देण्याचे आदेश निर्गमित केले आहे. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसाठी कोरोना प्रतिबंधित लस व किट उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आदेश द्यावे, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकातून केली आहे.

हे देखील वाचा : 

PMKISAN योजना अंतर्गत सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले निधीचे हस्तांतरण

जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार

 

lead storySantosh Tatikondawar