सोमवारपासून पुणेकरांना आणखी दिलासा, नियम शिथिल होणार

पुण्यातील निर्बंध सोमवारपासून शिथील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे, 11 जून:- उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. पुण्यातील निर्बंध सोमवारपासून शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडसाठी निर्बंध शिथिल करण्यात आलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या वर आहे. म्हणून पुण्यातील निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

पुण्यातील दुकानं संध्याकाळी सात पर्यंत उघडी राहणार आहे. 50 टक्के क्षमतेनं ही दुकानं सुरु असतील. हॉटेलही रात्री 10 पर्यंत 50 टक्क्यांच्या क्षमतेनं सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के उपस्थितीत सुरू होणारेय. मॉल सुरु होणार आहेत. पण सोमवारी मॉल बाबत नियमावली जाहीर करण्यात येईल. तर सिनेमा ,नाट्यगृह बंद राहतील. हे नवे नियम सोमवारपासून लागू होतील.

निर्बंध जरी शिथील करण्यात येत असले तरी लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावं, आवाहन अजित पवारांनी केले आहे. पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास इतर ठिकाणीही निर्बंध शिथिल करण्यात येतील, असं अजित पवार म्हणाले. 18 वर्षांच्या पुढील दिव्यांगाचे लसीकरण सुरू करणार असल्याचं सांगत अजित पवारांनी शनिवारी ,रविवारी केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार असल्याचंही सांगितलं आहे.

ajit pawarpune covid ratepune palikapune unlock