राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे 11 जानेवारी :- आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळं आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील 25 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज सोमवारी दुपारी दोन वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आला. कॉरोनामुळे शासनाने सांगितलेले नियम पाळून, मास्क वापरून आणि सामाजिक अंतर ठेऊन आंदोलनात करण्यात आले.

मागील काही दिवसापासून इंधन दर वाढीत खूप दर वाढ झाली आहे त्याचा विरोधात हा आंदोलन करण्यात आला . या आंदोलनात मेहबूब शेख (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस), रविकांत वर्पे (कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस), सूरज चव्हाण (कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस), संजोग वाघेरे पाटील (शहराध्यक्ष – राष्ट्रवादी कॉग्रस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा), महेश हांडे (पुणे शहर युवक अध्यक्ष), सचिन घोटकुले, (पुणे जिल्हा युवक अध्यक्ष) आणि विशाल शंकर वाकडकर (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर) तसेच सर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

petrol desel price high