राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पुण्याची अर्चना वाघमारे प्रथम

अकोल्याचा विशाल नंदागवळी द्वितीय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, 21 ऑक्टोबर :-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विचारज्योत फाउंडेशन चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच आभासी पध्दतीने जाहीर झाला असून यामध्ये पुण्याची अर्चना वाघमारे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. अकोल्याचा विशाल नंदागवळी द्वितीय तर चंद्रपूरची पल्लवी रामटेके यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रतून 130 निबंध प्राप्त झालेत. लोकशाहीच्या नजरेतून अमृत महोत्सवाचे रंग, रक्षा तुझी नी माझी हे संविधान करते, वर्तमान राजकीय स्थिती आणि देशाचे भविष्य, राष्ट्रउभारणीमध्ये युवकांचे योगदान आणि आधुनिक पिढीला सोसेना सोशल मिडिया असे एकुण पाच विषय ठेवण्यात आले होते. परीक्षक म्हणून उमेश पारखी, रमेश बुरबुरे, डा. श्रीकांत पानघाटे, अरूण झगडकर आरि विशाल शेंडे यांनी जबाबदारी संभाळली.

चंद्रपूरची सुप्रिया विकल्प तेलतुंबडे, रत्नागिरीचा कल्पेश आत्माराम पारधी, चंद्रपूरची कोमल मधुकर चनमेनवार, नागपुरची रेवती नितीन लिंगे, गडचिरोलीची मयुरी रूषी मांडवगडे आणि गोंडपिपरीची अनुराधा रागीट यांना विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ अशा स्वरूपाचे पुरस्कार लवकरच स्पर्धकांना पाठवण्यात येईल. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव मुन्ना तावाडे, कोषाध्यक्ष दिनेश मंडपे, उपाध्यक्ष सिध्दार्थ दहागावकर, सदस्य तृप्ती साव, स्पर्धा संयोजक प्रलय म्हशाखेत्री, श्याम म्हशाखेत्री, नैना घुगुस्कर, करिष्मा खोब्रागडे यांनी विशेष सहकार्य केले.

हे पण वाचा :-

competitionessaylevelstate