कुरखेड्यातील जांभुळ व सीताफळ युनिट ला सी. ई. ओ. यांची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १३ जून : कुरखेडा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कुरखेडा तालुक्यात विविध व्यवसाय सुरू आहेत. अशातच कुरखेडा तालुक्यातील रामगड/पुराडा येथे जांभूळ तथा सीताफळ यांचे प्रक्रिया केंद्र आहे या केंद्रात जांभूळ व सीताफळ पासून त्याचे पल्प काढले जाते व ते पॅकिंग,लेबलिंग करून विक्रीसाठी साठी रायपूर व नागपूर या सारख्या ठिकाणी पाठविले जाते पाठविले जाते. गडचिरोली जिल्हा परिषदेचे सी. ई. ओ. कुमार आशीर्वाद सर यांनी या युनिट ची पाहणी करून सीताफळ व जांभूळ यांची प्रक्रिया कशी केली जाते व तो माल कुठे विकला जातो या संदर्भात माहिती जाणून घेतली.

यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष गडचिरोली येथील जिल्हा वयवस्थापक लाटकर, जिल्हा टीम, तालुका व्यवस्थापन कक्ष कुरखेडा येथील मारेकरी व तालुका टीम, कोरची येथील तालुका टीम व युनिट मधील महिला आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

मृताच्या नातेवाईकांनी केली इंटर्न डॉक्टरला मारहाण!, तीन लोक पोलिसांच्या ताब्यात

सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा

kumar Ashirwadlead story