पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 07 जुले –  गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 जुलै 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे  सकाळी ठिक 11.00 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

सदर रोजगार मेळाव्या मध्ये अनेक कंपन्या, महामंडळे उपस्थित असणार असून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराचा लाभ् घेण्यासाठी‍ सदर रोजगार मेळाव्याकरिता असलेले ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दि. 10 जुलै 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाशी  संपर्क करा. दुरध्वनी क्र.07132-222368.