व्यसन सोडा, गावाचे १० लाख रुपये वाचवा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 14 जून – ग्रामस्थांनी दरवर्षी दारू व तंबाखूचे व्यसन सोडल्यास गावात 10 लाख रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते, अशी जागृती भिंतीचित्राच्या माध्यमातून मुक्तीपथ तर्फे करण्यात येत आहे. आरमोरी तालुक्यातील 11 ग्रा.प. मध्ये हा उपक्रम राबवून व्यसनमुक्त होण्याचे आवाहन करण्यात आले व उर्वरित ग्रा.प. मध्ये सुद्धा अशा प्रकारचे भिंतीचित्र रंगविण्याचे नियोजित आहे. जिल्ह्यातील सर्व ४५७ हि ग्रा.प. अंतर्गत अशा प्रकारे जागृती करण्यात येणार आहे. आता पर्यंत कोरची, कुरखेडा, वडसा, धानोरा व चामोर्शी तालुक्यातील सर्व ग्रा.प. मध्ये भिंतीचित्र रंगविण्यात आले आहे.

 शासनाने दारू व तंबाखूवर बंदी घातली आहे. ग्रामपंचायत, ग्रामसभा व मुक्तीपथ गाव संघटनेद्वारा कृती करून गावातील अवैध दारू व तंबाखू विक्री बंद करावी. सोबतच गावातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनी उपचार घेऊन व्यसन सोडल्यास गावात दरवर्षी 10 लाख रुपयांची बचत होईल. त्यामुळे व्यसन सोडा 10 लाख रुपयांच्या योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन मुक्तीपथ अभियानाने भिंतीचित्राच्या माध्यमातून केले जात आहे. त्या अनुषंगाने आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी, कुलकुली, मानापूर, कोजबी, मोहझरी, सुकाळा, देलनवाडी, वैरागड, जांभळी, पिसेवडधा, कुरंडी माल या 11 गावांमध्ये ग्रामस्थांशी चर्चा करून भिंतीचित्रासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानुसार या गावांमध्ये हा उपक्रम राबवून जनजागृती केली जात आहे.

हे पण वाचा :-