लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 20 जुलै – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजाराम येथे 19 जुलै ला पहिली शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. शिक्षण परिषदेचे विधिवत उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा सौ.मिनाताई सडमेक, केंद्र प्रमुख विनोद पुसलवार, उच्च श्रेणी मुख्याध्यापक अजय पस्पुनुरवार राजाराम, छल्लेवाडा उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका कल्पना रागीवार, ताटीगुडम उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुख्तार शेख, गट साधन केंद्र अहेरी येथील विषयतज्ञ किशोर मेश्राम, राजु नागरे तसेच केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सदर परिषदेचे प्रास्ताविक विनोद पुसलवार यांनी केले. अजय पस्पुनुरवार आणि शेख यांनी परिषदेचे आयोजना बाबतीत सखोल मार्गदर्शन केले किशोर मेश्राम यांनी निपून भारत, विद्या प्रवेश यावर मार्गदर्शन केले. राजु नागरे यांनी योग्य टिप्पणी कशी करावे याचे मार्गदर्शन केले. सुरेश चुधरी यांनी फुलोरा बालभवन रचना ,स्तर निश्चिती यावर सखोल मार्गदर्शन केले. सुरजलाल येलमुले यांनी पाठ्यपुस्तकातील वहीचे पान माझी नोंद याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रसस्थ ऍप,जॉली फोनिक्स याविषयी चर्चा करण्यात आली.परिषदेचे संचलन सुरेशचंद्र जुमनाके यांनी तर आभार जी.के. मडावी यांनी केले.
हे पण वाचा :-