राजाराम खां. येथे १२० नागरिकांना शिकाऊ वाहनचालक परवाना (License) वितरित

पोलीस स्टेशन राजाराम खां. येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली अंतर्गत दि. १३/०७/२०२१ व १४/०७/२०२१ रोजी लायसन्स शिबीर आयोजित करण्यात आले होते.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाचा उपयोग दळणवळणासाठी व प्रवास करण्यासाठी करतात. परंतु क्वचितच नागरिकांकडे वाहनाचा वाहन चालक परवाना असते तर बहुतेक नागरिक विना वाहन चालक परवानाने दुचाकी व चारचाकी चालवत असतात.

त्यामुळे ज्यांच्याकडे वाहन चालक परवाना नसते अशा व्यक्तीचा अचानक अपघात (दुर्दैवी घटना) झाल्यास त्या वाहन चालकास कोणताच विमा अथवा नुकसानभरपाई लागू पावत नाही.

सदर बाब लक्षात घेवून पोलीस स्टेशन राजाराम खां. चे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली अंतर्गत दि. १३/०७/२०२१ व १४/०७/२०२१ रोजी लायसन्स शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात संगणक तंत्रज्ञ म्हणून प्रज्ञादिप मानकर व अमरदिप मानकर यांना पाचारण करण्यात आले होते.

सदर शिबिराचे उद्घाटन केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या कमांडंट यांनी केले तर प्रास्ताविक रवींद्र भोरे यांनी केले.

या शिबिराला परिसरातील जवळपास २०० नागरिक लोक उपस्थित होते. त्यापैकी सुमारे १२० नागरिकांचे शिकाऊ वाहन चालक परवाना काढून देण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पो. ह. मडावी,  झाडे,  वणकर आदींनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु; 966 आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध

गोंडवाना विद्यापीठ व माखनलाल चतुर्वेदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्यात सामंजस्य करार

विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

 ‘अर्थार्जनाचा उपयुक्त पर्याय’ मत्स्य पालन

 

lead storyrajaram khandla