राजे धर्मराव महाविद्यालय आलापल्ली तर्फे राजे सत्यवानराव महाराज यांच्या जयंती निमित्त रुग्णांना फळ व मास्कवाटप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. ३ डिसेंबर: राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथे श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम डॉ. मारोती टिपले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला त्या प्रसंगी महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी वृंदानी त्यांच्या प्रतीमेला आदरांजली अर्पण केली.

महाविद्यायाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग आणि क्रिडा विभाग यांच्या विद्यमाने असीसी सेवासदन रूग्णालय, नागेपली येथे उपचारार्थ दाखल असलेल्या अतिदुर्गम भागातील रूग्णांना फळे व माक्सचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी रूग्णालयातील डॉ.लिली आणि रूग्णसेवीका व महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.एम.यू.टिपले ,क्रिडाविभागप्रमूख प्रा.प्रकाश घोडमारे,रासेयो विभाग प्रमूख प्रा.डि.टी.डोंगरे, सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा.कू. प्रतिमा सूर्यवंशी, डॉ.आर.डब्लू.सूर, डॉ.एन.टि.खोब्रागडे, डॉ.आर.एन.कूबडे, प्रा.रविन्द्र ढवळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कू.प्रतिमा सूर्यवंशी, संचालन डॉ.आर.डब्लू.सूर तर आभारप्रदर्शन प्रा.डि.टी.डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वंयमसेवक किरण खोब्रागडे,मनिष सोनूले,राजू कालंगा,उज्वल सोनवणे, विवेकानंद आलाम, रोशन मडावी,शूभम सडमेक,कू. रीना शूध्दलवार,कू. रोशनी राऊत,कू.नंदीनी गूरूनूले, कू. संध्या येलकूलवार कू.महेश्वरी सिडाम यांनी सहकार्य केले.