लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई :- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे .रामदास आठवले यांनी काल पायल घोष यांना आरपीआयचे सदस्यत्व दिले. यानंतर, त्याने कफ आणि शरीरावर वेदना झाल्याची तक्रार केली. यानंतर त्याची कोरोना टेस्ट झाली. त्यांना एका खासगी हॉस्पिटल दाखल करण्यात आला . शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइं च्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. गो कोरोना चाजगप्रसिध्द नारा देणारे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे झुंझार लढाऊ संघर्षनायक आहेत.ते कोरोनावर मात करून नक्की चांगले होतील अशी प्रार्थना चाहत्यांची असून ना रामदास आठवले यांच्या पाठीशी पुण्यबळ आहेत.गरिबांचे आशीर्वाद त्यांचे रक्षण करतील. ते कोरोनावर मात करून पुन्हा गोरगरिबांच्या बहुजनांच्या देशाच्या सेवेत हसतमुखाने हजर राहतील अशी प्रार्थना लाखो चाहत्यांनी व्यक्त केली आहे.