पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांची रांगोळी…

३५ ग्रॅम रांगोळी अन तीन तासांच्या मेहनतीतून साकारली बाबासाहेब...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 नाशिक 6 डिसेंबर :-  पिंपळाच्या पानावर यापूर्वी रेखाटन, पेंटिंग, कटिंग असे बरेच प्रयोग अनेकांनी केले परंतु पिंपळाच्या अवघ्या ५ इंचाच्या पानावर ४ इंच बाय ३ इंच आकारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारण्याचा अनोखा विक्रम नाशिक जिल्ह्यातील नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव ता. चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे यांनी केला. ६ डिसेंबर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी हिरे यांनी अनोखे अभिवादन केले आहे. तीन तासांचे सलग प्रयत्न, स्केच न करता बोटांच्या चिमटीतून काही इंचभर जागेवर रांगोळी सोडण्याची हातोटी, बाबासाहेबांवरील अमर्याद प्रेम यातूनच ही कलाकृती जन्मल्याचं हिरे सांगतात.

या कलाकृतीसाठी अवघी ३५ ग्रॅम रांगोळी लागली असली तरी ती काही इंचभर जागेत कोणतेही स्केच न करता महामानवाची प्रतिमा जशी च्या तशी साकारणं हा कलेचा अद्भुत अविष्कारचं असल्याचं प्रत्यक्ष रांगोळी बघणारे लोक म्हणत आहेत, दरम्यान देव हिरे हे नेहमी आपल्या अद्भुत कलाविष्काराने राज्यभरात चर्चेत राहतात. यापूर्वी भाकरीवर, पाण्यावर त्यांनी काढलेली रांगोळी फार चर्चेत होती आणि आत्ता पिंपळाच्या पानावरील ही रांगोळी अविस्मरणीय ठरली आहे. देव हिरे यांच्या अनेक कलाकृतींची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली आहे.

हे पण वाचा :-