महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयास रासेयो पुरस्कार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

आष्टी, 5 ऑक्टोंबर : वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयास गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने प्राचार्य डॉ. संजय फुलझेले व प्रा. डॉ .राजकुमार मुसणे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र कुलगुरू डॉ . श्रीराम कावळे, जिल्हाधिकारी संजय मीना, आमदार देवराव होळी, समाजसेवक डॉ सतीश गोगुलवार, अधिष्ठाता डॉ चंद्रमौळी, डॉ. अनिल चिताडे, कुलसचिव हिरेकन, डॉ नंदाजी सातपुते व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्या शुभहस्ते गोंडवाना विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना गडचिरोली जिल्हा 2022- 23 उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्राचार्य डॉ संजय फुलझेले व प्रा.राजकुमार मुसने यांना गौरविण्यात आले.

वनविभाग शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलूभैय्या हकीम, सामजिक कार्यकर्त्या शाहीन हकीम, यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य संजय फुलझेले व प्रा.डॉ.राजकुमार मुसणे यांच्या नेतृत्त्वात मागील तीन वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती, जल ही जीवन है, पर्यावरण संवर्धन, पशु चिकित्सा शिबिर, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, योगनृत्य शिबिराचे यशस्वी आयोजन व प्रचार आणि प्रसार केला. चपराळा यात्रेत भाविकांकरिता विविध सेवा दिल्या. पाणपोई, प्लास्टिक निर्मूलन, मतदार जनजागृती, साक्षरता, स्पर्धा परीक्षा, डिजिटल इंडिया, हर घर तिरंगा, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमाच्या यशस्वी आयोजनातून स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. जंगल व्याप्त अतिदुर्गम, नक्षल प्रभावित चपराळा या छोट्या खेड्यात निवासी शिबिराचे यशस्वी आयोजन केले विविध लोकोपयोगी कार्याची दखल घेत गोंडवाना विद्यापीठाने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट महाविद्यालय एकक पुरस्काराने सन्मानित केले.

डॉ .गणेश खुणे, डॉ. रवी शास्त्रकार, डॉ .भारत पांडे, प्रा.शाम कोरडे, प्रा. रवी गजभिये, प्रा. ज्योती बोबाटे, प्रा नासिका गभणे, प्रा. विजया बल्की, राजू लखमापुरे, निलेश नाकाडे, लोमेश घुटके, दिलीप मडावी, इरफान शेख, मुस्ताक शेख, सुजित बाच्छाळ, विनोद तोरे, संतोष बारापात्रे, जगदीश, आचल, पायल, शीतल, सावली, प्रीतम, विठ्ठल, निखिल, प्रीती आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

हे पण वाचा :-