कमलापूर परिसरातील विविध मागण्यासाठी रेपनपल्ली येथे ४ जुलै ला रास्ता रोको आंदोलन

ग्रामसभा पॅनल कमलापूर व छल्लेवाडा स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण समिती यांच्या नेतृत्वात होणार आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : तालुक्यातील कमलापूर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता रविवार ४ जुलै रोजी रेपनपल्ली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

ग्रामसभा पॅनल कमलापूर व छल्लेवाडा स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन करण्यात येईल. कमलापूर येथे मंजूर मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीचे बांधकाम करावे, अतिक्रमण धारकांचे तीन पिढी पुरावा अट रद्द करण्यात यावी.

छलेवाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायतची निर्मिती करण्यात यावी. कमलापूर येथे मंजूर असलेले ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम सुरु करण्यात यावे. दामरंचा

बससेवा सुरू करावी, वनमजुरांची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी. कमलापूर येथे महाविद्यालय सुरु करण्यात यावे, वनउपज गोळा करण्यासाठी खरेदी विक्री केंद्र सुरु करण्यात यावे, आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अहेरी ते सिरोंचा कमलापूर-छल्लेवाडा-राजाराम मार्गे बस सेवा सुरु करण्यात यावी.

कमलापूर येथील नवीन तलावाचे शिल्लक खोलीकरण व कॅनल बांधकाम करण्यात यावे, कमलापूर येथील लक्कामेंडा पहाडीला पर्यटन स्थळ घोषित करून विकास करावा, आदी मागण्या मांडल्या जाणार आहेत.

या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व माजी सरपंच तथा ग्राम सभा पॅनल अध्यक्ष रजनीता मडावी, भारतीय जनसंसद गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे, भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार, कमलापूर ग्राम पंचायतचे  सदस्य किटा गावडे, ग्रा.पं. सदस्य माया आईला, माजी सरपंच सांबया करपेत, माजी उपसरपंच कमलापूर शंकर आत्राम, माजी सरपंच रेपनपल्ली रामचंद्र पोरतेट, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन अहेरी तालुका अध्यक्ष मोहन मदने, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन गडचिरोली तालुका अध्यक्ष योगेश तुळवे आदी पदाधिकारी करणार आहेत.

हे देखील वाचा :

सिंदेवाहीत जबरान जोत शेतकर्‍यांचा एल्गार; राजु झोडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन

पुनर्वसनाच्या मागणीसाठी व्यापारी मंडळाच्या धरणे आंदोलनाला प्रारंभ; भामरागड येथील संपूर्ण व्यापार पेठ १०० टक्के बंद

…या महिन्यात सुरु होऊ शकतात महाविद्यालये – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

 

 

Chakka jam Andolanlead story