कोरोना काळात कार्य करणाऱ्या कोविड योध्यांच्या हस्ते जालना मैत्र मांदियाळी च्या दिनदर्शिकेचे विमोचन.

विजय साळी – जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. १० डिसेंबर: जालना शहरातील मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात, सन 2014 पासून प्रकाशभाऊ आमटे आणि मंदाताई आमटे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत या कार्याची सुरुवात झाली आहे. त्यात दरवर्षी मुलांना शैक्षणीक मदत करणे किंवा विविध सामाजिक उपक्रम जालना शहरामध्ये राबविले जातात,आणि त्याचा गोषवारा दरवर्षी लोकांसमोर मांडत असतो,वेगवेगळ्या ठिकाणी विविध व्यक्तींच्या माध्यमातून या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात येत असते.

यावर्षी देखील मैत्र मांदियाळी च्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक,नर्स,वॉर्डबॉय,नगरपालिकेचे कर्मचारी ज्यांनी अंत्यसंस्कारामध्ये महत्वाची भूमिका बजावली, यांनी दिलेल्या योगदानाचा कुठेतरी गौरव करावा आणि आपल्या हातून यांचे कार्य समाजासमोर यावे या उद्देशाने या वर्षी कोविड सेंटर ची निवड करण्यात येऊन या सर्व कोविड योध्यांच्या हस्ते मैत्र मांदियाळी च्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.तसेच सर्व कोविड योध्यांना फुलाचे रोपटे ही भेट देण्यात आले.

अजय किंगरे – मैत्र मांदियाळी जालना

मैत्र मांदियाळी दिनदर्शिका 2021 चे विमोचन कोविड सेंटर, सरकारी रुग्णालय येथे कोरोना लढाईत सहभागी असलेले सर्व योध्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पद्मजा सराफ, डॉ संजय जगताप, डॉ आशिष राठोड, डॉ प्रज्ञा कोयाळकर , अंत्यसंस्कार साठी सहकार्य करणारे कर्मचारी श्री वानखेडे व सर्व परिचारक, वार्ड बॉय यांची उपस्थिती होती.