रिलायन्स जिओचा २०२१ मध्ये भारतात ५ जी सेवा सुरु करण्याचा मानस – मुकेश अंबानी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. ९ डिसेंबर: रिलायन्स जिओ २०२१ या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ५ जी सेवा सुरु करण्याची तयारी करत असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. जोपर्यंत धोरणात्मकरीत्या यात सुलभता आणली जात नाही आणि स्वस्त सेवा दिली जाणार नाही तोवर सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचण्याची शक्यता नाही, असेही अंबानी म्हणाले इंडिया मोबाईल कॉंग्रेस – २०२० मध्ये संबोधित करतांना मुकेश अंबानी म्हणाले की, ५ जी सेवा सुरु करण्यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रक्रिया वेगवान करण्याची आवश्यकता आहे. ही यंत्रणा परवडणाऱ्या दारात आणि सर्वत्र उपलब्ध व्हावी. मी तुम्हाला आश्वस्त कृ इच्छितो की, भारतामधील ५ जी क्रांतीत जिओ अग्रेसर असणार आहे. त्यासाठी स्वदेशी नेटवर्क हर्द्वार्क आणि तंत्रज्ञानाच्या सुट्या भागांचे बळ मिळणार आहे.

जीओची ५ जी सेवा ही महात्वाकांक्षी ध्येय असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानची चाचणी ठरणार आहे, असेही अंबानी म्हणाले २ जी फोनचा वापर करणाऱ्या ३०० दशलक्ष वापरकर्त्यांनी स्मार्टफोनचा वापर करावा, यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप करावा. डिजिटल संपर्क यंत्रणा असलेल्या जगभरातील उत्कृष्ट देशांपैकी भारत आहे. हे ३०० दशलक्ष वापरकर्ते हे २ जी फोनचा वापरात अडकून पडले आहेत. सेमी कंडकटरच्या निर्मितीत देशात हब तयार करणे शक्य आहे. मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहणे शक्य नसल्याचे मत अंबानी यांनी व्यक्त केले.

आकांक्षित मागास जिल्हयांचे रॅंकिग सुधारल्याबद्दल राज्यपालांची जिल्हाधिकाऱ्यांना कौतुकाची थाप.