रेपनपल्ली पोलीसांनी केला ट्रक व अवैध दारुसह एकुण 25,57,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

सिरोंचा: गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असुन, आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ¬ा प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने दिनांक 28 सप्टेंबर रोजी ट्रक वाहन क्र. एम एच 12 एफ. झेड. 8931 ने काही इसम अहेरी ते सिरोंचा रोडने अवैध दारुची वाहतुक करणार आहे अशी गोपनिय माहिती मिळाली.आलापल्ली ते सिरोंचा रोडवर कमलापुर टि-पार्इंट जवळ सापळा रचुन बसले असतांना, सकाळी 06:00 वा. चे दरम्यान एक संशयीत ट्रक वाहन हे भरधाव वेगाने येतांना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन थांबवून वाहनामध्ये असलेल्या इसमांचे नावे विचारले असता, त्यांनी आपले नाव संजय महिपत सावंत, वय 51 वर्षे, रा. मुंढे, ता. कराड, जि. सातारा व त्यासोबतच दुसरा इसम नामे सुनिल प्रकाश पवार, वय-32 वर्षे, रा. जैसिंगपुर, ता. शिरोड, जि. कोल्हापुर असे सांगितले.
त्यानंतर त्यांना वाहन अडविण्याचे कारण सांगून पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात 90 एम.एल रॉकेट संत्रा डिस्टिलरी देशी दारुचे 502 बॉक्स, प्रति बॉक्समध्ये 100 नग प्रमाणे एकुण 50,200 नग रॉकेट देशी दारुच्या बॉटल अंदाजे किंमत एकुण 17,57,000/- रुपयांचा दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरण्यात आलेले जुने टाटा कंपनीचे 2518 सी मॉडेल ट्रक, वाहन क्र. एम एच 12 एफ. झेड. 8931 अंदाजे किंमत 8,00,000/- रुपये असा एकुण 25,57,000/- (अक्षरी पंचवीस लाख सत्तावन्न हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे रेपनपल्ली येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप.क्र. 11/2024, मदाका कलम 65 (अ), 83 अन्वये आरोपी नामे संजय महिपत सावंत, वय 51 वर्षे, व्यवसाय – चालक, रा. मुंढे, ता. कराड, जि. सातारा व सुनिल प्रकाश पवार, वय-32 वर्षे, व्यवसाय – क्लीनर, रा. जैसिंगपुर, ता. शिरोड, जि. कोल्हापुर यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रेपनपल्ली संतोष काजळे, सतिश पवार, प्रियंका मेश्राम,  नैताम, यादव,  गायकवाड, तुंकलवार, चिंतमवार यांनी पार पाडली.

Comments (0)
Add Comment