पुरोगामी म्हणविणाऱ्या महाविकास आघाडी सरकार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्यावा – गौतम सोनवणे

  • बांद्रा जिल्हा अधिकारी कार्यलयावर पदोन्नतीमध्ये आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाचे तीव्र निदर्शने आंदोलन
  • पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलनाचा धडाका सुरू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 2 जून – पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घ्यावा. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या आणि स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या महाविकास आघाडी सरकार च्या काळात मराठा आरक्षण गेले;ओबीसींचे आरक्षण गेले आणि मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण डावलले आहे. त्यामुळे राज्य सरकार ने त्वरित पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसर आज बांद्रा पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यलयावर रिपब्लिकन पक्षातर्फे पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपाइं चे गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष विवेक पवार; सिद्धार्थ कासारे; दयाळ बहादूरे; तानाजी गायकवाड; प्रकाश कमलाकर जाधव; किसन रोकडे;अमित तांबे;अस्मिता अहिरे; आदी रिपाइं चेपदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

पदोन्नती मधील आरक्षणाच्या
मागणीसाठी दि. 1 जून पासून रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोललनाचा धडाका सुरू झाला आहे.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यभर तसेच मुंबईत ही अनेक ठिकाणी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे.दि 1जून पासून सुरू झालेला रिपाइं चा आंदोलन सप्ताह दि. 7 जून पर्यंत राज्यभर सुरू राहणार असून महाविकास आघाडी सरकार ने दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या संयमाचा अंत पाहू नये असा ईशारा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी राज्य सरकार ला दिला आहे.

मुंबईत ताडदेव सर्कल येथे पदोन्नतीमध्ये अरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

चेंबूर मध्ये ;अणुशक्ती नगर येथे आंदोलन करण्यात आले. सिद्धार्थ कॉलनी आंदोलन करण्यात आले.

गोरेगाव आरे कॉलनी सिग्नल येथे स्तारोको आंदोलन करण्यात आले.
तसेच राज्यात सोलापूर येथे रिपाइं चे राज्य सरचिटणीस राजा सरवदे; कोल्हापूर येथे प्रा शहाजी कांबळे उत्तम कांबळे आदींच्या नेतृत्वात पदोन्नतीमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले.

आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्हा अधिकारी आणि तहसील कार्यलयावर दि.1 जून ते 7 जून पर्यंत रिपाइं तर्फे आंदोलन सप्ताह आयोजित केला आहे. या आंदोलनात कोरोना प्रसाराचे नियम पाळून गर्दी न करता आंदोलन करण्याच्या सूचना ना रामदास आठवले यांनी दिल्या आहेत.

हे देखील वाचा :

कोविड संसर्गामुळे आई वडिलांच्या मृत्यूने अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्त्व स्वीकारण्यास शासन खंबीर – ॲड. यशोमती ठाकूर

वाघाचा रस्ता अडविल्या प्रकरणी ‘त्या’ ४ जनांना वन विभागाने दिले नोटिस

gautam sonavanelead story