गावातील विविध समस्या घेऊन चेरपल्ली, गड बामनी व गडअहेरी वासियांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची घेतली भेट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

अहेरी, दि. २४ सप्टेंबर: अहेरी ग्राम पंचायत मधून नगर पंचायत मद्ये समायोजन होऊन 7-8 वर्षाचा कालावधी होऊन देखील चेरपल्ली, गडबामनी व गडअहेरी गावांतील अनेक समस्या नगर पंचायत द्वारे मार्गी न लागल्याने हताश होऊन येथील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना गावातील विविध समस्या घेऊन तिन्ही गावातील गाव वासियानी भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.

सदर नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. 16 चेरपल्ली, व प्रभाग क्र. 17 गडबामणी, गडअहेरी हे तीन्ही गाव सन १९४० पुर्वीपासुन वास्तव्य करीत असून सदर गावातील नागरीकांना आजतागायत आखिव पत्रिका देण्यात आले नाही. त्यामुळे सदर गावातील नागरिकांना अहेरी नगरपंचायत झाल्यापासुन कोणत्याही योजनांचा लाभ घेता आले नाही.

तसेच गावातील नागरीक प्रधानमंत्री आवास योजनेकरीता अर्ज असून गावातील जमिनीच्या समस्या मुळे घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. यापूर्वी ग्रामपंचायत असतांना गावातील नागरीकांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे. सदर गावे हे वनविभागातील अतिक्रमण क्षेत्रात येत असल्याने सदर गावातील नागरीकांकडे पुरावे अपुरे पडत आहे. त्याकरीता सदर गावातील नागरीकांना आखिव पत्रिका मंजुर करून देण्यात यावी. जेणेकरून गावातील नागरीकांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेता येईल.

तसेच गावातील नागरीक हे नगर पंचायत मध्ये समाविष्ठ झाल्यापासुन एकुण ९ वर्ष पुर्ण झाले आहे. तेव्हापासून गावातील नागरीकांनी शासनाअंतर्गत कृषि विभाग, महसुल विभाग, पंचायत विभाग, नगर पंचायत, आदिवासी विभाग, सिंचाई विभाग असे अनेक विभागातील शासनामार्फत राबविण्यात येणारे योजनांची लाभ घेता आले नाही. तसेच योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.

त्यामुळे समस्या लक्षात घेऊन गावातील नागरीकांच्या जमीनीची मौका चौकशी करून आखिव पत्रिकेत नोंद करण्यात यावी व आखिव पत्रिका वाटप करण्यात यावी अशी मागणी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी तिन्ही गावातील जवळपास शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून या मागणीला जोर दिला.

हे देखील वाचा :

गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला

सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे ऑस्ट्रेलियात माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षणाकरिता पात्र विद्यार्थीना इंग्लिश स्पीकींग कोर्स ला नागपूरला रवाना

 

Aheri NagarpanchayatMLA Dharmarao Atram