लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
धानोरा, 25 सप्टेंबर : जागतिक अंदाजानुसार कर्करोग आणि हृदय विकारांनंतर श्वसन विकार हे मृत्यूचे तिसरे सर्वात महत्त्वाचे कारण ठरत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे या विकाराचे प्रमाणही निर्विवादपणे वाढतच आहे. गडचिरोली सारख्या भागातही वाढत्या शहरीकरणामुळे श्वसन विकारांचे रुग्ण वाढत आहेत. समाजाची ही गरज लक्षात घेता सर्च रुग्णालयाने श्वसन विकार ओपीडी सुरू केली आहे. ओपीडी दर महिन्याच्या चौथ्या बुधवारला नियोजीत असून २७ सप्टेम्बर २०२३ रोजी श्वसनविकार तज्ञ ओपीडीमध्ये रुग्णसेवा देतील.
दमा (अस्थमा), सिगारेट मुळे झालेले श्वसन विकार, क्षयरोग व क्षयरोगा नंतर होणारे फुफ्फुस विकार, कोरोना मुळे उद्भवलेले फुफ्फुस विकार, लहान मुलांचा दमा, ॲलर्जी मुळे होणारे श्वसन विकार अशा अनेक श्वसन विकारांवर उपचार दिले जातील. तरी या ओपीडीचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे.
हे पण वाचा :-