पंचायत समिती भामरागड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी घेतली आढावा बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 27 जून : दि. 26 जून 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली कुमार आशिर्वाद व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) माणिक चव्हाण यांनी पंचायत समिती भामरागडला भेट दिली व पंचायत समिती अंतर्गत विविध विकास कामाचा आढावा घेतला.

अपूर्ण घरकूल पूर्ण करण्याच्या सूचना सर्व ग्रामसेवकांना देण्यात आल्या व 10 ऑगस्ट 2021 पर्यंत सर्व अपूर्ण घरकूल पूर्ण करुन घेण्यास सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम पूर्ण करण्यास सांगितले. तसेच पूर्ण केलेल्या शौचालयाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

जल जिवन मिशन अंतर्गत नळ जोडणीचे कामे तात्काळ पूर्ण करण्यास सांगितले. नरेगाच्या कामाचा आढावा घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्यास व मजुरांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या. 5 टक्के अबंध निधीच्या खर्चाची तपासणी ग्रामसेवक यांचे पासबूक व कॅशबूक याची पाहणी करुन 5 टक्के निधी खर्चाच्या कामाची पाहणी केली.

14 वा वित्त आयोग कामाची तपासणी केली. मानव विकास अंतर्गत विजभांडवल खर्चाचा आढावा घेतला. ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. Time Stam Camera मधून काढलेल्या फोटोचा आढावा घेतला व कमी फोटो असलेल्या ग्राम सेवकांची दप्तर तपासणी करुन कार्यवाही करण्याच्या सूचना गट विकास अधिकारी यांना दिल्या.

बांधकाम विभागाचा आढावा घेऊन शाळा दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम इ. कामांची पाहणी करुन कामाचा दर्जा तपासणी करण्यास ग्रामसेवकांना सांगितले. काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

विविध विकास कामाचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता ताडगाव-पल्ली रोडवरील पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली तसेच ताडगाव-पल्ली रोडचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना कनिष्ठ अभियंता यांना देण्यात आल्या असे गट विकास अधिकारी पंचायत समिती, भामरागड राहुल चव्हाण यांनी कळविले.

हे देखील वाचा:

प्राथमिक आरोग्य केंद्र मन्नेराजाराम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांची आकस्मिक भेट

गडचिरोली जिल्ह्यात आज 34 कोरोनामुक्त तर 18 नवीन कोरोना बाधित

कोविड बाबत गडचिरोली जिल्हयात स्टेज ३ नुसार नवीन आदेश जारी

 

Dr. Milind Meshramkumar Ashirwadlead storypanchayat samiti bhamragad