लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : दि. ९ , जिल्हयात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून गडचिरोली तील तीनही मतदार संघात एकून २९ उमेदवार आपले नशीब अजमावत आहे.या उमेदवारांनी जाहीर केलेल्या मालमतेच्या तपशिलानुसार जिल्हात एकून ८ उमेदवार कोट्यावधी चे धनी आहेत, यात दक्षिण गडचिरोली तील अहेरी मतदार संघातून तब्बल पाच उमेदवार असून आरमोरी मतदार संघातून तीन व गडचिरोली मतदार संघातून एक असे उमेदवार कोट्यावधी संपत्तीचे धनी आहेत.
दक्षिण गडचिरोली मतदार संघातील श्रीमंतीची सर्वत्र चर्चा होत आहे. यामध्ये मा. मंत्री धर्मराव बाबा यांचे संपतीत घट झाल्याचे दिसून येत असून उर्वरित उमेदवाराचे संपत्तीत लक्षनीय वाढ झालेली दिसत आहे.