रोहा प्रेस्कलबची सामाजिक बांधिलकी, वट पौर्णिमेला केले वृक्षांची लागवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

रोहा, 6 जून- वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |पक्षीही सुस्वरे आळवीती ॥ साधू संत महात्मे लिखित आहे की झाडांवर प्रेम करा त्यांचे प्रेम घ्या वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान.निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे. अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे. वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.त्याच धर्तीवर गेली अनेक वर्षे रोहा प्रेसक्लब च्या वतीने पर्यावरणाची सामाजिक बांधिलकीतुन वटपिर्णिमा या दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करत आहेत परंतु वृक्ष संपदा जोपासण्याची आजची गरज असल्याचे प्रतिपादन रायगड प्रेसक्लब चे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र जाधव यांनी केले .

गेली सात वर्ष प्रेस क्लब हा उपक्रम राबवत असून सालाबादप्रमाणे याही वर्षी रोहा प्रेसक्लब तसेच रोहा रोटरी क्लब यांच्या संयुक्त विदयमाने रोहा तालुक्यातील धाटाव येथील वैकुंठ धाम परिसरात वड,पिंपळ,जांभूळ,चेरी,करंज, कडुनिंब,अशी वेगवेगळी प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोहा प्रेसक्लबचे माजी अध्यक्ष शशिकांत मोरे,जेष्ठ पत्रकार आणि कार्याध्यक्ष सुहास खरीवले, रोटरी क्लब रोहा चे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, प्रेस्कलबच्या प्रधान सचिव सौ समिधा अष्टीवकर,सचिन शेडगे,नरेश कुशवाहा, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष डॉ श्याम लोखंडे,सचिव रविंद्र कान्हेकर, विशू लुमन, योगेश राऊत, जितेंद्र जाधव,सह प्रेसक्लबचे सदस्य तसेच पर्यावरण प्रेमी व गावचे प्रथम नागरिक सचिन रटाटे,ग्राम पंचायत सदस्य सूर्यकांत मोरे,बाबू रटाटे, रुपेश शिगवण,गणेश भोकटे, संतोष जाधव,भाऊ शेळके,आदीनी यावेळी वृक्षारोपण केले.

आपल्याना निसर्गाच्या सान्निध्यात सृष्टीचा दृक्‌श्राव्य अनुभव घेता यावा, यासारखे भाग्य ते कोणते? मनातील आठवणींची पिसे भिरभिरू लागली.धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वेली.यांच्यावर प्रेम करा त्यांची जोपासना करा त्यांचे रक्षण करा त्याच बरोबर समाजातील प्रत्येक माणसाने एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना मनाशी बाळगत पर्यावरण वाचवण्याकरिता मदत केली पाहिजे समाजात समजला जाणारा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार आहेत त्यामुळे त्यांनी हाती घेतलेली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रोहा रोटरी क्लब सदैव तत्पर आहे त्याच बरोबर रोटरी क्लब ऑफ रोहा सुंदर आणि सुजलाम सुफलाम रोहा रंगीत फुलांचे शहर संकल्पनेला रोहेकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे रोह्यातील अनेक संस्था यामध्ये सहभागी होत आहेत दर रविवारी या हाती घेतलेल्या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी अधिक आवाहन रोटरी क्लब ऑफ रोहा चे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर यांनी केले आहे.

तसेच आज पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपण येथे वृक्ष लागवड केली आहे गेली अनेक वर्षाचा हाती घेतलेला उपक्रम फलदायी ठरत आहे रोहा प्रेस क्लबने रोहा निवी लांढर कळवा रोड लगत लावलेली झाडे आज आपल्याना सावली देत असल्याचा या उपक्रमाचे शेवटी पर्यावरण प्रेमी तसेच ग्राम पंचायत धाटाव चे सदस्य सूर्यकांत मोरे यांनी आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.

हे पण वाचा :-