- चिचपल्ली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातिल दोन इमारतींची राखरांगोळी, 15 कोटीचे नुकसान
- आयएएस अधिकार्यांचा नेतृत्वातील तज्ञा मार्फत चौकशी करणार
- आग लावली गेली की शॉर्टसर्किट ने लागली याचा तपास होणार, दोषी आढळल्यास कोणाला ही सोडणार नाही – पालकमंत्री विजय वडेटटीवार
चंद्रपूर, दि॰ २७ फेब्रुवारी :- सिंगापुरच्या धरतीवर चंद्रपूर लगतच्या चिचपल्लीत साकारत असलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातिल इमारतीला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगित दर्शनी भागातील दोन इमारती जळून खाक झाल्या असून जवळपास 15 कोटीचे नुकसान झाल्याच्या अंदाज आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आयएएस अधिकार्यांच्या नेतृत्वातील तज्ञामार्फत या प्रकारणाची चौकशी जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेटटीवार यांनी सांगितले.
चंद्रपुरात 91 कोटीच्या निधितुन साकार होत असलेली बांबुची इमारत जळल्याची माहीती मिळ्ताच पालककमंत्री विजय वडेटटीवार यांनी पाहणी केली, बांबू प्रशिक्षण केंद्राला आग कश्या मुळे लागली, हे अद्याप कळाले नसून सोमवारला मुख्यमंत्री सोबत चर्चा करुण चौकशी केली जाणार असून चौकशी अंती दोषी आढळल्यास त्यांच्या वर कारवाई केली जाणार. बांबू व प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम योग्य असला तरी बांबूचे प्रशिक्षण देण्यासाठी इमारतीला ते ही जंगलात बांबु मोठ्या प्रमाणात लावण्याची कुठलीही गरज नव्हती. या मुळे 91 कोटी रुपये पाण्यात गेले असल्याचे पालकमंत्री विजय वडेटटीवार यांनी म्हटले आहे.