जिल्ह्यात कोविड बाबत नियमावली आणि उपाययोजना १४ जूननंतरही राहणार सुरु

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आदेश निर्गमित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ११ जून : गडचिरोली जिल्हा हा पातळी ३ मध्ये समाविष्ट होत असल्या कारणाने कोविड बाबत जिल्ह्यातील नियमावली आणि उपाययोजना १४ जून नंतरही सुरुच राहणार आहेत. दिनांक १० जून २०२१ चे शासन आदेशातील तरतुदींच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा हा पातळी ३ (Level-3) मध्ये समाविष्ट होतो.

त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी शासन निर्देशाप्रमाणे कोविड – १९ बाबत गडचिरोली जिल्हा सीमा क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नियमावली आणि उपाययोजना कालावधी १४ जुन २०२१ नंतरही पुढील आदेशापर्यंत लागू राहतील असे आदेश निर्गमित केले आहेत.

शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देशाप्रमाणे निर्गमित केलेले या अगोदरच्या आदेशातील सर्व निर्णय, सूचना, अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल.

हे देखील वाचा : 

मल्लमपोडूर,कोरेगाव येथील सरपंचाशी साधला मुख्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात संवाद

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्युसह 69 कोरोनामुक्त, तर 16 नवीन कोरोना बाधित

गोविंदपूर नाल्यावरील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा – खा. अशोक नेते

 

Deepak Singlalead story