साईनाथची जागतिक कुस्ती स्पर्धेत बाजी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाडा – जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाच्या ५१ कीलो वजनगटात सहभागी झालेला वाडा तालुक्यांतील साईनाथ पारधी याची कझाकीस्थानच्या येरासी मुसान या कुस्तीगीरा सोबत कास्यपदकासाठी लढत झाली. या लढतीत साईनाथ पारधी याने 3 विरुध्द 1 या गुण फरकाने मात करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.

वाडा तालुक्यातील गोऱ्हे गावासारख्या खेड्यातून पुढे जात साईनाथ पारधी याने मिळविले यश हे निश्चित वाखालण्याजोगे असून सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक होत आहे. साईनाथचे वडिलांना देखील कुस्तीची मोठी आवड होती मात्र एका अपघातात त्यांना अपंगत्व आले आहे. आई मोलमजुरी करून संसार चालवत असून साईनाथ भविष्यात कुस्तीच्या मोठ्या स्पर्धा गाजवून त्याच्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करील असा सर्वांनाच विश्वास होता.

कास्यपदकजागतिक कुस्ती स्पर्धासाईनाथ पारधी