लोकस्पर्श न्युज नेटवर्क
पालघर 13 फेब्रुवारी :- अनेक संघर्षानंतर मेहनत व जिद्दीच्या जोरावर पालघरमधील राहुल दिलीप जैन या तरुणाने किमया साधली आहे. कुटुंबाच्या पडझडीतून सावरत त्याने आपली स्वप्ने सत्यात उतरवून अँकरिंग क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले आहेत. सध्या राहुल पालघर व परिसरात सुप्रसिद्ध अँकर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
उदयपूर येथे राहुल याचे संपूर्ण सधन कुटुंब राहत होते आई अनिता वडील दिलीप बहीण दर्शना व राहुल सुखी समाधानी कुटुंब होते मात्र व्यवसायातील पडझडीमुळे वडिलांवर मोठे संकट आले व वडील उदयपूर येथून अहमदाबाद येथे कामानिमित्त स्थलांतर झाले त्यानंतर व्यवसायात खच्चीकरण झाल्यानंतर या कुटुंबाला अचानक गरिबीने घेरले. व्यवसायातील तोट्यामुळे राहुल याचे वडील दिलीप यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी पालघर येथे येऊन कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी अनेक ठिकाणी लहान मोठे नोकरी करून आपला कुटुंबाचा रहाटगाडा चालवला.
दरम्यान आजारपणामुळे अचानक रहुलच्या वडीलांचे निधन झाले. लहान वयातच राहुल याचे कुटुंब उघड्यावर पडले. लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी राहुलच्या आईने जिद्दीने उभे राहायचे ठरवले व त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणासह घरकाम करून राहुल व त्याची बहीण व याचे संगोपन केले त्यात दोघांचेही शिक्षण सुरू होते
कोणताही पाठिंबा नसताना राहुलच्या बहिणीने कुटुंबाला हातभार लावायला सुरुवात केली त्यानंतर राहुल दहावीत असताना त्याला कुटुंबाच्या जबाबदारीची जाण झाली व त्यातून त्याने कामाला सुरुवात केली. सेल्समन, शिकवणी आदी प्रकारच्या पार्ट टाइम जॉबमधून त्याने आईला घरात छोटा-मोठा हातभार लावायला सुरुवात केला. महाविद्यालयीन जीवनात राहुल एक चांगला होतकरू व हुशार तरुण म्हणून पुढे आला. शिकता शिकता राहुल याच्या वैविध्यपूर्ण अंगीकृत असलेल्या कलागुणांमुळे तो उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून त्याने त्याचे नाव कमावले.
“अत्यंत गरीब परिस्थितीतून राहुल याने अँकरिंग क्षेत्रात अल्पावधीत मानसन्मान प्राप्त केला आहे. त्याच्या या यशामुळे आनंद असून तो पुढेही आपली कामगिरी उंचावून यशाची अनेक शिखरे गाठेल असा मला आत्मविश्वास आहे.” असा विश्वास राहुलची आई
अनिता जैन यांनी व्यक्त केला आहे.
याच दरम्यान त्याला त्याच्या एका मार्गदर्शकाकडून अँकरिंग क्षेत्रामध्ये अँकर होण्याची संधी मिळाली व या संधीचे सोने करत त्याने ही संधी आपले भविष्य म्हणून निवडले व त्यातूनच हळूहळू राहुल अँकरिंग क्षेत्रात रमू लागला कोणतेही मार्गदर्शन नसताना त्याने सुरुवातीच्या काळात लहान लहान इव्हेंट मधून अँकरिंग करायला सुरुवात केली त्यानंतर त्याला या क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत असताना अनेकांनी त्याच्या कामाचे कौतुक केले व त्याला काम मिळू लागले ही त्याच्या कामाची खरी पोचपावती आहे अल्पावधीतच त्यांनी त्याच्या बोलण्याने अँकरिंग क्षेत्रात आपले कसब दाखवून सर्वांना भुरळ पाडली व पालघर मधील एक उभारता तरुण अँकर राहुल जैन म्हणून नाव सर्वश्रुत होऊ लागले
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत न डगमगता राहुल यांनी खंबीरपणे आत्मविश्वासाच्या जोरावर अँकरिंग क्षेत्रात पदार्पण करत आपल्या कौशल्याची छाप पालघरच नव्हे तर कर्नाटक मुंबई व भारताच्या इतर कानाकोपऱ्यात उमटवली यात सोबत या क्षेत्रातून त्याने अनेक सेलिब्रिटीच्या इंटरव्यू घेतलेल्या आहेत त्यातूनच तो आता उभारी घेऊ पाहतोय पालघर मधील आरजे या नावाने सध्या त्याला ओळखले जात आहे स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्याने ही किमया साध्य केली असली तरी भविष्यात त्याच्या पंखांना आणखीन बळ देण्याची आवश्यकता असल्याचे तो सांगतो अनेक इव्हेंट आस्थागायात केली असले तरी पुढे जाऊन चमकता तारा म्हणून कामगिरी बजवायची आहे असे तो सांगतो आई-बहीण व दिवंगत वडील यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी अँकरिंग क्षेत्रात पाय रोवून उभा असल्याचे तो अभिमानाने सांगतो.
येऊ घातलेल्या अनेक इव्हेंट्स मध्ये त्याला सध्या महाराष्ट्रातून व देशाबाहेरून ऑफर येऊ लागल्या आहेत सध्या त्याच्या मेहनतीमुळे तो बिझी शेड्युल मध्ये असला तरी आजही राहुल हा जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा आहे त्याला घडवण्यामध्ये त्याच्या आईचा मोठा वाटा असल्याचे तो सांगत असून आजवर माझ्या कारकिर्दीचा यश हे माझ्या आईमुळे प्राप्त झाल्याचेही तो म्हणतो त्याच्या या घडण्यामध्ये त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभारही त्याने मानले आहेत कितीही मोठा झालो तरी पालघर प्रति माझे प्रेम कायम राहील असे तो नेहमीच सांगत आला आहे माझ्यासारख्या इतर तरुणांनी प्रोत्साहित व्हावे यासाठी मी सदोदित प्रयत्न करीन व असे अनेक तरुण तयार करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.
राहुल याने पालघरच्या कॅनन इंग्लिश स्कूल मधून दहावी केली असून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातून त्याने मार्केटिंग वाणिज्य शाखेतून बी एम एस पूर्ण केले आहे महाविद्यालयातून तो अँकर झाल्यानंतर त्याला अँकरिंग साठी एका कार्यक्रमाचे बोलावणे आले होते ही त्याच्यासाठी गर्वाची बाब होती.
हे पण वाचा :-