लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 21 ऑक्टोबर :- घरकुलधारकांना शासन निर्णया प्रमाणे 5 ब्रास रेती मोफत देण्यासंदर्भात शासन निर्णय आहे. मात्र, जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे याकडे जातीने लक्ष देउन जिल्ह्यातील घरकुल घारकांना मोफत 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. देवराव होली यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेउन निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रेती मुबलक प्रमाणात आहे. मात्र, या जिल्ह्याची रेती बाहेर जिल्ह्यात तस्करी करून विकल्या जाते. परंतु जिल्ह्यातील घरकुलधारकांना शासन निर्णय असतांना ही रेती उपलब्ध होत नही ही मोठी खंत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरकुल धारकांना 5 ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.
हे पण वाचा :-