आलापल्ली, दि. २४ जानेवारी: केंद्रीय मानव अधिकार संघटन न्यू दिल्ली येथील राष्ट्रीय चेयरमॅन डॉ. मिलिंदजी दहिवले यांनी ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्याकडे सतत मागील दहा वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुमूल्य भागात सामाजिक कार्य करत असल्याचे संदीप दोडके यांची शिफारस करण्यात आली. त्यावर शोध प्रबंधक म्हणून ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांनी दखल घेतली. मागील पांडिचेरी येथे डॉक्टर या पदवीचे हस्तांतर करण्याचे ठरले होते. पण कोरोना महामारी लॉकडाऊन असल्यामुळे पदवी बहाल करता आली नाही. म्हणून त्याकरिता ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते संदीप दोडके यांना सामाजिक क्षेत्रांमधील डॉक्टर म्हणून पदवी बहाल करण्यात आली.
त्याकरिता मान्यवर केंद्रीय मानव अधिकार संघटन दिल्लीचे राष्ट्रीय चेरमेन डॉक्टर मिलिंद दहिवले सोबत सहकारी भंडारा प्रभारी अध्यक्ष श्रीकांत सहारे, विलास सिडाम, अनिल गुरनुले, श्रीकांत कोकुलवार, यांनी शुभकामना देऊन आभार मानले तसेच गडचिरोलीभर कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.