सांगलीच्या मूक बधिर सिद्धार्थ कलगुटगीला कराटे या खेळ प्रकारात मिळाले सुवर्ण पदक

  • नेपाळ येथील काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रिय स्पर्धेत हे यश मिळाले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. १७ मार्च: सांगलीच्या वडर गल्ली येथे राहणाऱ्या सिद्धार्थ शशिकांत कलगुटगीला कराटे या खेळ प्रकारात सुवर्ण पदक मिळाले.
नेपाळ येथिल काठमांडू येथे झालेल्या 6 व्या आंतरराष्ट्रिय कराटे स्पर्धेत 15 ते 20 किलो वजनी गटात, सिद्धार्थ ला सुवर्ण पदक मिळाले.

सुवर्ण पदक पटकावणाऱ्या सिद्धार्थ कलगुटगीचे सांगलीत जल्लोषात असे स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षन करून रस्त्यावर फुलांची रांगोळी काढून डिजिटल बोर्ड लावून जंगी स्वागत करण्यात आले. सिद्धार्थच्या घरची परिस्थिती ही गरिबीची आहे. सिद्धार्थची आई ही जन्माता मूक बधिर असून ती धुनी भांडी करून संसाराला मदत करत असते. सिद्धार्थ कलगुटगी हा जन्मता मुख बधिर असून त्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच सर्वत्र कौतुक होत आहे. तर सिद्धार्थचे प्रशिक्षक म्हणून हमजे खान यांनी काम केलेले आहे. सिद्धार्थ कडून प्रशिक्षणाचा एक रुपया सुद्धा मोबदला हमजे खान यांनी घेतला नाही. यावेळी कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सिद्धार्थचा सत्कार केला.

वडार समाजाचे जिल्हा अध्यक्ष सतीश नाईक, माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका वर्षा निंबाळकर, अमर निंबाळकर, सुजित राऊत यांनी ही सिद्धार्थचा सत्कार केला.