वडसा रेल्वे स्थानकाजवळ सफाई कर्मचाऱ्याचा रेल्वेखाली मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली दि,२६ नोव्हेंबर : वडसा रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेत नगर परिषदेतील सफाई कर्मचारी रोशन किसन सहारे (रा. रावणवाडी) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सहारे हे नेहमीप्रमाणे रेल्वे रूळ ओलांडत असताना अचानक आलेल्या सुपरफास्ट रेल्वेगाडीचा अंदाज न आल्याने ते तिच्या धडकेत सापडले. धडक इतकी तीव्र होती की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघात ब्रह्मपुरी मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ दुपारी सुमारास २ वाजता घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Wadasa railway accident