5 जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, 04 जानेवारी :- PMC बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत अखेर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत. याआधीच ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर आज खुद्द चौकशीसाठी त्या ईडी कार्यालयात पोहोचल्या आहे.
तीन दिवसांपूर्वी ईडीने या प्रकरणाशी संबंधीत एक खुलासा केला होता. ‘संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि माधुरी प्रवीण राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार आहेत. या संस्थेकडून आधी 5625 रुपयांची रक्कम मिळाली आहे. पण 12 लाख रुपयांची कर्जाची रक्कम अद्याप बाकी आहे, असा खुलासा ईडीने आपल्या तपासातून केला होता.
काय आहे PMC बँक घोटाळा?
पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.