दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे समाधान करणे हिच माझ्या कामाची पावती :जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक 1, गोंड मोहल्ला येथे सिमेंट काँक्रीट रोड व नाली च्या बांधकामाचे भूमिपूजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली:२ ऑगस्ट ,

नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे  चेहऱ्यावर समाधान  झळकले हिच माझ्या कामाची पावती  असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेचे (Gadchiroli zilla parishad)अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सोमवारी नागेपल्ली  येथील वॉर्ड क्रमांक 1 गोंड मोहल्ला येथे सिमेंट काँक्रीट रोड व नाली च्या बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी बोलतांना केले .

जिल्हा वार्षिक योजना निधीतून सिमेंट काँक्रीट रोड व नाली च्या बांधकामाचे भूमिपूजन सोमवारी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वार्डात पक्का रस्ता व नाली नसल्याने येथील रहिवाश्यांना ये-जा करताना अडचणीना तोंड द्यावे लागत होते.पावसाळ्यात चिखल तुडवीत जावे लागत असे सोबतच नाली नसल्याने पावसाचे पाणी येजा करायच्या मार्गावर वाहत असल्याने शाळकरी विद्यार्थी ,व येथील रहिवाश्यांना त्या नाल्यासारख्या वाहणाऱ्या  पाण्यातूनच वाट काढावी लागत असे.

या संदर्भात येथील रहीवास्यांनी अनेकदा ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधीकडे कित्येकवेळा निवेदन देऊन  पाठपुरावा केला होता. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्यान जीप अध्यक्ष अजय कंकडालवार प्रचारासाठी या भागात आले असतांना येथील नागरिकांनी निवेदन देऊन समस्या त्यांच्या ध्यान्यात आणून दिली असता, त्यांनी सिमेंट कॉंक्रीट रोड व नाली साठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.त्या नुसार या ठिकाणी १० लाखाचा निधी विकासकामासाठी  जिल्हा वार्षिक योजना निधीतून  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मंजूर करून दिला आज या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जीप सदस्य  अजय नैताम,नागेपल्ली चे सरपंच लक्ष्मण कोडापे,उपसरपंच रमेश शानगोंडावार,ग्रांप सदस्य स्मिता निमसरकार, ग्रांप सदस्य लक्ष्मी सिडाम, ग्रांप सदस्य आशिष पाटील ,विशाल रापेल्लीवार, ग्रांप सदस्य ज्योती ठाकरे, ग्रांप सदस्य फेलिक्स गिध, ग्रांप सदस्य राहुल सिडाम,किशोर मांडोगडे,मधुकर नरसापुरे, दीपक मांडोगडे,वैभव रापेल्लीवार,नरडे, वेलादी,नारायण कुमरे, दिवाकर दब्बा आदि.सह या वार्डातील नागरिकांची उपस्थिती होती.

ajaykankdalwargadchirolizppresident