अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश

इयत्ता पहिलीच्या प्रक्रियेला सुरुवात, 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामंकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
इयत्ता 1 ली प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा व दिनांक 01 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्याचा पालक शासकीय/ निमशासकीय नोकर नसावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लक्ष पेक्षा कमी असावे. या योजनेतंर्गत आदिम जमाती/दारिद्रय रेषेखालील/ विधवा/घटस्फोटित व निराधार यादीतील पाल्याचा प्राध्यान्याने विचार केला जाईल. इयत्ता 1 ली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
इयत्ता 1 ली प्रवेशासाठी अर्ज प्रकल्प कार्यालय गडचिरोली तसेच प्रकल्पांतर्गत नजीकच्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळेत निशुल्क उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील. प्रवेशासाठीचे आवेदन पत्र आवश्यक कागदपत्रांसह 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली कार्यालयास सादर करण्यात यावे. असे सहायक प्रकल्प अधिकारी प्रशासन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी कळविले आहे.

admission for allEnglish Medium Schoolfree school