हवामान विभागाने मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी केल्याने 20 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये राहणार बंद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 19 जुलै – जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवित ऑरेंज अलर्ट जारी केल्याने गुरुवारी 20 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाडयांना सुटी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आज जारी केला.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून, वैनगंगा ,गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलागौतम व इंद्रावती इत्यादी नद्यांच्या पात्रात वाढ होत असल्याने अनेक मार्गही बंद आहेत. अशातच हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा व महाविद्यालये गुरुवारी २० जुलै रोजी बंद राहतील. मात्र, इतर सर्व कार्यालये, आस्थापना आणि दुकाने सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय मीणा यांनी जारी केले आहेत.

हे पण वाचा :-

 

Gadchiroliheavy rain alertschool off