उपविभागातील चार बॅडमिंटनपट्टूंची राज्य स्पर्धेकरिता निवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 27 जुलै – महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनने नुकतीच आरमोरी येथील तालुका क्रीडा संकुलात मानांकित स्पर्धा घेऊन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्यासाठी बॅडमिंटनपटूंची निवड केली. यात अहेरी उपविभागातील मुलचेरा तालुक्यातील चार बॅडमिंटनपटूंची निवड त्यांच्या उत्कृष्ट खेळाने झाली.यात 17 वर्षाखालील मुलांमध्ये शिवाशिष दास, इंद्रजीत मित्रा तर पंधरा वर्षाखालील मुलामध्ये प्रेम गाईन व गौरव मंडल यांची निवड झाल्याने मार्गदर्शक तथा महाराष्ट्र स्पोर्ट असोसिएशनचे सचिव कुमारसानू मुजुमदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यानंतर सदर खेळाडू महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत अहमदनगर येथे 27 ऑगस्ट ते एक सप्टेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा, ठाणे येथे वीस ते 24 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा खेळाडू खेळणार आहेत.जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश मुरवटकर, सचिव मुकेश नागपुरे, डॉ प्रशांत जोडे, डॉ प्रशांत राकडे यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळाल्याने त्यांचे प्रमाणपत्र, शील्ड व खेळ साहित्य देऊन राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

हे पण वाचा :-