लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ एप्रिल: कुरखेडा येथील तरुण भारत वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी बंडू लांजेवार यांना कोरोना या संसर्ग रोगाने ग्रासले होते. यांना गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
जेष्ठ पत्रकार बंडू लांजेवार यांच्या निधनाने पत्रकार क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात असून गडचिरोली पत्रकार क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.