वरिष्ठ पत्रकार मारोतराव मेश्राम यांचे निधन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. ११/११/२०२०:- येथील ज्येष्ठ पत्रकार आणि ‘युगधर्म’ या हिंदी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी मारोतराव मेश्राम यांचे आज सकाळी साडेसहा वाजता दीर्घ आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते ६४ वर्षांचेहोते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. मारोतराव मेश्राम हे मागील २५ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. जनवाद, दैनिक भास्कर, युगधर्म या दैनिकांसह विज्ञापन की दुनिया व राष्ट्रपत्रिका या साप्ताहिकांमध्येही त्यांनी जिल्हा बातमीदार म्हणून काम केले. त्यांनी प्रदीर्घ काळ कैंंसर या आजाराशी लढा दिला. मृदूभाषी व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Marotrav Meshram