लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. ३ एप्रिल: माझा विदर्भ न्यूज युट्यूब चॅनेलचे जेष्ठ पत्रकार विजय दिघे यांचे नागपुरातील मेयो रुग्णालयात काल संध्याकाळी कोरोना या संसर्ग रोगाच्या उपचारादरम्यान निधन झाले आहे. विजय दिघे यांचा गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाशी संघर्ष सुरु होता. अखेर शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांत विजय दिघे यांचा संघर्ष
२१ वर्षापुर्वी एप्रिल २००० मध्ये विजय हैद्राबादच्या रामोजी फिल्म सिटी मध्ये जॉईन झाले होते. न्यूज अॅकर ते फिल्ड रिपोर्टर अशी त्याची कारकिर्द. सतत सहकार्याच्या भुमिकेत असलेले टेलिव्हिजन माध्यमातील एक उत्साही व्यक्तिमत्व. एप्रिल २००० ला रामोजी राव यांच्या रामोजी राव फिल्म सिटी मध्ये ईटीव्ही मराठी ला वृत्तनिवेदक म्हणून इलेक्ट्रॉनिक मिडीयात कारकिर्द सुरू केली. व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही विजय चा आवाज बातम्यांमधून महाराष्ट्राने ऐकला. ईटीव्ही मराठी च्या “हॅलो इंडिया” या प्रातःकालीन कार्यक्रमाचे अॅ़कर म्हणून विजय ने भारतातील अनेक राज्यांमध्ये घडणार्या जगावेगळ्या कथा महाराष्ट्राच्या जनतेला सांगितल्या. इलेक्ट्रॉनिक माध्यमांत विजय चा संघर्ष फार मोठा आहे. या माध्यमात स्वतः चे स्थान निर्माण करण्यासाठी जैष्ट्य पत्रकार विजय ने सतत धडपड केली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांत करियर करण्यासाठीच विजय ने हैद्राबाद गाठले होते. तेथून दिल्ली आणि नंतर नागपुरातील विजय चा प्रवास मात्र आता थांबला आहे.