जेष्ठ साहित्यीक प्रा.सतेश्वर मोरे यांचे निधन

आंबेडकरी समाज व साहित्य क्षेत्रात शोककळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. 3 मार्च: अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक व संघटक, प्रख्यात कवी, गझलकार, नाटककार, समीक्षक प्रा. सतेश्वर मोरे यांचे काल सायंकाळी नागपूरच्या खाजगी रुग्णालयात कोरोनाने निधन झालं.

आंबेडकरी समाजात तथा साहित्य क्षेत्रात प्रा. मोरे यांच्या जाण्याने अतीव शोककळा पसरली आहे. अनेक आंबेडकरी साहित्य संमेलनाचे संघटन, प्रवर्तन आणि आयोजन करून प्रा. मोरे यांनी आंबेडकरी चळवळीला कायम गतिमान ठेवण्याचे अविरत कार्य केले.

आंबेडकरी चळवळीतील त्यांचा कृतीशील सहभाग दलितपँथर चळवळीपासून तर खैरलांजी आंदोलनात कारावास भोगण्यापर्यंत राहिला. असंख्य आंबेडकरी तरुण साहित्यिकांची शतकोत्तर फळी तयार करण्यात प्रा.सतेश्वर मोरे यांचा सिंहाचा वाटा आहे.

समकालीन साहित्य हे बुद्धप्रणित वैज्ञानिकतेवर आधारित असावे आणि त्या अनुषंगाने साहित्यनिर्मिती व्हावी असे स्पष्ट प्रतिपादन प्रा. मोरे यांचे असायचे.

त्यांची “मेजर” ही कविता लोकप्रिय असून 1991 साली लिहलेल्या “बाई” या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात गाजले होते. मराठी साहित्याच्या अकादमीक क्षेत्रात प्रा. मोरे हे तितकेच लोकप्रिय नाव होते.

प्रा. मोरे हे गेल्या 25 वर्षांपासून बडनेरा येथील आरडीआयके महाविद्यालयात मराठी चे प्राध्यापक।म्हणून कार्यरत होते.

महाराष्ट्र नव्हे तर देशभरात प्रा मोरे यांचे आंबेडकरी चळवळी संदर्भात प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू होते.

Prof. Sateshwar More