पाच मोरांच्या मृत्युने खळबळ – शिरूर कासार तालुक्यात बर्ड फ्लू ची दहशत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड, दि. २२ जानेवारी:  बीड जिल्ह्यात बर्ड फ्लू ची दहशत कमी व्हायचं नाव घेत नाही. शिरूर कासार तालुक्यातील लोणी शिवारात आज पाच मोरांच्या मृत्युने खळबळ उडाली आहे. आज सकाळी १० च्या सुमारास लोणी शिवारातील अंबादास दत्तोबा केदार यांच्या शेतामध्ये चार मोर मृत पावल्याचे आढळून आले. यावेळी त्या ठिकाणी एक मोर जिवंत होता.

मात्र थोड्याच वेळात त्याने ही प्राण सोडल्याचे प्रत्यक्षदर्शी भास्कर बडे यांनी सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी शिरूरचे पशुसंवर्धन अधिकारी दाखल झाले असून मृतांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे पशु संवर्धन अधिकारी यांनी सांगितलं.

Bird Flue