नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची संवेदनशीलता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर 18 ऑगस्ट :-  जिल्हा आणि सत्र न्यायालयात शुक्रवारी अचंबित करणारा घटना घडली. कोर्टात आणलेल्या एक आरोपीची प्रकृती अचानक बिघडली. ही घटना कानी पडताच तर प्रसंगी कठोरात कठोर शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांच्या मानवतेचे आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडले. आरोपीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी खुद्द न्यायाधिश घटनास्थळी आले.

जिल्हा व सत्र न्यायालयातील द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांच्या समक्ष सकाळी आरोपीला हजर करणार होते. . ११ वाजताच्या सुमारास पोलिसांनी त्याला न्यायालयात आणले. न्यायालयीन कामकाजाला वेळ असल्याने आरोपीला व्हरांड्यातील बाकड्यावर बसविले होते. अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या तोंडातून फेस निघू लागला आणि तो बेशुद्ध पडला. बाकड्यावरून तो खाली पडला. हा प्रकार एका दक्ष वकिलाच्या लक्षात आला. त्यांनी लगेच न्यायालयात जाऊन न्यायाधीशांना हा प्रकार सांगितला.

न्यायाधीशांनी शिरस्तेदाराला बाहेर जाऊन सत्य परिस्थिती काय आहे हे माहीती करण्याचे आदेश दिले. सत्यतेची खात्री पटल्यानंतर न्यायाधीश झपाटे यांनी पोलिसांना आत बोलविले आणि आरोपीला त्वरित उपचार देण्याचे आदेश दिले. पोलिसांनी वऱ्हांड्यात पडलेल्या आरोपीला उठवून बसविले. त्याला उपचार देण्याऐवजी परंतु त्याला तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले नाही .हा प्रकार दक्ष वकिलाने पुन्हा न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिला. त्यावर न्यायाधीश झपाटे आपले न्यायपीठ सोडून बाहेर आले आणि गंभीरतेने कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला.डॉक्टरांच्या तपासणीनंतर अर्ध्या तासानेआरोपीला पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले. न्यायाधीश झपाटे यांच्या कनवाळूपणाबद्दल दिवसभर न्यायालयात चर्चा सुरू होती.

हे देखील वाचा :-

अतिवृष्टीमुळे वर्ध्याच्या भिवापूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

 

 

courtdistrictcourtnagpurpolice